माझीच लढाई

Started by Dnyaneshwar Musale, December 26, 2019, 11:32:15 PM

Previous topic - Next topic

Dnyaneshwar Musale

जितराब म्याल
त्याच्यावरल्या गाडलेल्या बोराट्या
उकराव्या कुत्र्यांनी
तशी हाडामासाची  माणसं गरीबाच आयुष्य उकरतात,
केमबळाच्या घराला एखाद्या मेडीचा आधार असताना
पण ती ही मोडावी तरी त्या कडे  लक्ष नसावं कुणाचं,
ठिगळाच्या चड्डीतुन चिगळलेल्या जखमेचा रक्ताचा डाग दिसावा
तव्हा कशी झाकणार ओ गरीबी,
अरे कातड्याच्या वाहनांचा अंगठा तुटलेला
असताना
सावकार अंगठा गहाण ठेवतो तव्हा
बोजा चडल्याचा त्रास होत नाही
पण
बाप रडल्याचा त्रास होतो.
तरीही खपाट्या झालेल्या पोटाला तर कधी भुक लागतच नाही,
इलाज कसला आलाय यावर
चोखांड भाकरीत सारी लेकरं जेवत असतात,
गरिबीची भुंगे पोटाला दिस रात चावतच असतात.
अरे गरिबी रडत कधीच नसते
स्वतःशीच रोज लढत असते.

ज्ञानेश्वर मुसळे.