जगणारं आयुष्यं

Started by अभिजित पुजारी, December 28, 2019, 02:56:22 PM

Previous topic - Next topic

अभिजित पुजारी

'' जगणारं आयुष्यं''

जीवन किती ... किती सुंदर आहे...
जगण्याचा पैलू मात्र खूपच वाईट आहे,

त्रासाने भरलेल्या डबक्यात ...
आनंदाचे पाणी शिंपडायचं असतं,
आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक संकटाला...
हसून गोंधळात मात्र टाकायचं असतं,

खरं सांगू मित्रा सगळं संपत असताना ..., आयुष्याच्या अंधारात कोलमडताना ...
कुठूनतरी एक हात हातात येतो आणि गर्भगळीत आयुष्य पुन्हा एकदा सावरून जातं,

संकटाचं काय ? ती तर येणारचं ...आणि आपली घट्ट मुळ तर रोवणारचं,
आपण मात्र स्थिर राहायचं असतं ...अगदी शांत पाण्यासारखं,

किती दिवसाचं आयुष्यं हे ... त्याचा कालावधी ...आज ना उद्या तर संपतच असतो,
आणि आपण मात्र ... पाय आखडून सुखाने झोपी जात असतो ...अगदी सुन्नं मनाने ...!!!

-   अभिजित पुजारी
अभिजित पुजारी

Tanaji Pawale


Mane Aakash