काळजाला आज माझ्या

Started by कवी अमोलभाऊ शिंदे पाटील, December 30, 2019, 06:10:56 AM

Previous topic - Next topic

कवी अमोलभाऊ शिंदे पाटील

*शीर्षक.काळजाला आज माझ्या*

काळजाला आज माझ्या घाव किती हे झाले
मिटवण्या भांडण माझे गाव किती हे आले

लग्न गाठ बांधलीस तू जरी दुसऱ्याशी आज
बघ डोहाळ जेवनात माझे नाव किती हे आले

लिहून ठेवलेली पत्र तुझ्या माझ्या प्रेमाची
फाडलीस तू जरी त्यास भाव किती हे आले

दार लागले होते प्रत्येक घराचे पाहून मला
चूक नसतांना माझ्यावर डाव किती हे आले

विरोध नव्हता गं तुझ्या तिरस्काराचा मला
फक्त खोट्या प्रेमात स्वभाव किती हे आले

कवितेने बांधले आहेत हात माझे आज इथे
नाहीतर मला संपवण्याचे ठराव किती हे आले

गेलीस तर दूर जा इतकी की मी विसरेल सारं
तुला विसरण्याचे माथी सराव किती हे आले

✍🏻(कविराज.अमोल शिंदे पाटील).
मो.९६३७०४०९००.अहमदनगर