आठवतो कविता

Started by कवी अमोलभाऊ शिंदे पाटील, December 30, 2019, 06:11:34 AM

Previous topic - Next topic

कवी अमोलभाऊ शिंदे पाटील

*शीर्षक.आठवतो कविता*

कागदावर शब्द जुळताच घडवतो कविता
नव्याने पुन्हा पुन्हा तुझी आठवतो कविता

तुला नी मला रोज
स्वप्नं सारखेच पडते
योगायोगाने पुन्हा
आपले मिलन घडते

मिलनात या अशाही साठवतो कविता
नव्याने पुन्हा पुन्हा तुझी आठवतो कविता

जाऊ नको आता दूर
आला आसवांना पूर
साथ देशील मला
मनी माझ्या हा सूर

विरह गीत होईल म्हणून सोडवतो कविता
नव्याने पुन्हा पुन्हा तुझी आठवतो कविता

वाटलंच होत मला
तू नाक मुरडशील
I love you बोललो
म्हणून नक्कीच ओरडशील

ओरडलीस तरी प्रेमाची पाठवतो कविता
नव्याने पुन्हा पुन्हा तुझी आठवतो कविता

का आणि कशाला
प्रश्न विचारतेस नवे
प्रेम आहे तुझ्यावर
आता तुला दिसायला हवे

कळले नाहीच तुला तर बोलावतो कविता
नव्याने पुन्हा पुन्हा तुझी आठवतो कविता

बस्स कर आता
खूप छळलं आहेस तू
सरण सजलं आहे माझं
असं दूर का आहेस तू

आज सरणावर शब्दांची पांघरतो कविता
नव्याने पुन्हा पुन्हा तुझी आठवतो कविता

✍🏻(कविराज.अमोल शिंदे पाटील).
मो.९६३७०४०९००.अहमदनगर