नयन नशिले

Started by Dr.Manjusha Kulkarni, January 04, 2020, 01:10:23 PM

Previous topic - Next topic

Dr.Manjusha Kulkarni

नयन नशिले

नजरेत तुझ्या जे आहे
मदिरालयी कोठे नाही
मजला तल्लफ डोळ्यांची
जी कुठेच भेटत नाही

तू सहज पाहतानाही
मज झिंग वेगळी चढते
मी अडकून डोळ्यांमध्ये
वाट स्वप्नातील उलगडते

तू रोखून नजरेला मज
असे एकटक पाहते ना
मी श्वासासही थांबवतो
हा देह मूर्त होते ना

त्या नजरेने घायाळ
हे अंतःकरण बिचारे
तळमळून वेडेपिसे ते
तू दिसशील केंव्हा विचारे

मी मिटतो लोचने दोन्ही
तव नेत्रसुखाचे वारे
मी विश्व पाहतो तेथे
तव दृष्टीतून मज सारे

काय नजर पडली तुझी ती
मी स्वतःच बंदी झालो
तू जा म्हटले ना तरीही
मी खेचत जवळी आलो

आता ना कोठे जाणे
मज व्यसनही नाही शराबी
तू नजरेने पाजवते
ती प्रीतशराब गुलाबी

तू मृगनयनी की मीनाक्षी
जादूची मुखावर नक्षी
दिलखेचक शरसंधान
धडधड जोराने वक्षी

हे चंद्र सूर्य तव नयनी
की तारे इश्काचे सारे
मज जीवापाड गं आहेत
तव नयन  दोन हे प्यारे

मजवरी सदा तू रोखून
नजरेस अशीच पहा गं
मी शहीद होईन कितीदा
तू संजीवनी सदा गं

रचना ©डॉ.मंजूषा कुलकर्णी
दि.३/१/२०२०
रात्री ११.१० वा.

MK ADMIN


Nilesh@123


Nilesh@123