कविता

Started by गायत्री सोनजे, January 06, 2020, 05:20:52 PM

Previous topic - Next topic

गायत्री सोनजे


तो मला म्हणायचा
तू न सुकणारं माझ्या
आयुष्यातलं पान आहेस...

मैत्रीच्या नात्यात
उगवणारं हिरवगार
जीवनातलं रान आहेस...

निर्मळपणे मनातलं
ऐकणारं कडू गोड आठवाचं
नितळ मन आहेस...

माझ्या प्राजंळ
मैत्रीची साथ देणारी
माझी शान आहेस....

- गायत्री

SAURABH (SRP)