खरचं सांग

Started by कवी अमोलभाऊ शिंदे पाटील, January 09, 2020, 07:24:58 AM

Previous topic - Next topic

कवी अमोलभाऊ शिंदे पाटील

*शीर्षक.खरचं सांग*

ती आता भेटत ही नाही
पहिल्या सारखं खेटतं ही नाही
वाटतंय जरासं ती विसरली आता
कारण तिचा खरा जीवनसाथी दुसराचं होता
पाहून मला का उलटे फिरले वारे

जाऊदे सोड तू सारे
खरचं सांग मी तुला आवडत नव्हतो कारे

माझ्या सोबती सावल्या बाजुला झाल्या
जिथं तुझ्या माझ्या भेटी रोज झाल्या
अन ती ओसाड जागा ते एकटं पडलेलं फुल
आता तिथं बांधाव कसं प्रेमाचं घरकुल
तिथं खाक झाल्या आठवणी खाक झाले पत्र
उरले आता काळजावरचे चित्र
पडले डोळ्यासमोर प्रेमाचे रखरखते निखारे

जाऊदे सोड तू सारे
खरचं सांग मी तुला आवडत नव्हतो का रे

कॉलेजात गेल्यावर ती जागा साफ नसते
शेजारी कोण नाही कवितेची वही असते
एक ओळी दोन ओळी कवितेची सुरवात होते
हवेची झुळूक बेंच वरची धूळ उडवते
नजर तिकडे जाते कविता फुल्ल stop घेते
तू शेजारी असल्याचा भास होतो
काळजाला पुन्हा प्रेमाचा त्रास होतो
बघ तेव्हाच कसे उडतात आसवांचे फवारे

जाऊदे सोड तू सारे
खरचं सांग मी तुला आवडत नव्हतो का रे

कॉलेजच्या कँटिंग मध्ये
एकाच कपात कॉफी प्यायचो
त्या निमित्तान एक रूप व्हायचो
तोच कप आज तुझी आठवण करून देतोय
तोच कप अजून साथ देतोय
फक्त त्यावेळी कॉफी
अन आज दोन ओळी लिहण्याची शाई
काय करावं सुचतं नाही
म्हणून मीचं काही बोलतं नाही
खरचं कशासाठी केलेस तू इशारे

जाऊदे सोड तू सारे
खरचं सांग मी तुला आवडत नव्हतो का रे

✍🏻(कविराज. अमोल शिंदे पाटील).मो.९६३७०४०९००.अहमदनगर