तुझ्या विना राहवत नाही मला थोडासा वेळ देशील ना तु मला

Started by harishnaitam, January 12, 2020, 10:19:10 AM

Previous topic - Next topic

harishnaitam

तुझ्या विना राहवत नाही मला थोडासा वेळ देशील ना तु मला


खुप काही बोलावस वाटत मला
पण कसं बोलू तुला हेच कळत नाही मला
तुझ्या शिवाय राहवत नाही मला
नक्की समजून घेशील ना तु मला ||

तुझ्याशी अबोल राहिलेल राहवत नाही मला
तिव्र ईच्छा होते तुझ्याशी बोलण्याची मला
पण तुझ्या जवळ वेळ नाही म्हणून बोलावं वाटत नाही मला
पण खरंच तुझ्या विना करमत नाही मला ||

रोज तुझी dp पाहिल्या विना राहवत नाही मला
रोजच खुप आठवण येते तुझी मला
तु online असली कि बरं वाटतं मला
तरी पण msg नाही करत तु मला ||

तुझ्याबद्दलचे विचार नेहमी सतावत असतात मला
रात्री सुखाची झोप कधीच येऊ देत नाही ती मला
तुला भेटण्याची इच्छा होते खुप मला
भेटण्यासाठी थोडा वेळ देशील ना तु मला ||


कवी : हरिष नैताम
ठाणेगांव ता. आरमोरी
जि. गडचिरोली
मो.न. 9834209927