।।देवाची साथ।।

Started by Tejaswi Mohite, January 12, 2020, 04:42:19 PM

Previous topic - Next topic

Tejaswi Mohite

                 ।।देवाची साथ।।

ठायी-ठायी माझें आस्तित्व....
त्या दगडामध्ये मी नव्हे रे....
साद घालून बघ मनाला
तुझ्यातसुद्धा मीच रे...।।

असतील लाख शंका तुझला..
वेळ आली की होईल त्यांचे निरसन रे..
प्रयत्न करूनदेखील अपयश आले
तरीही तुझ्यासोबतच मी असेन रे...।।

ज्यादिवशी तू मानशील हार
तेव्हा तूच होशील निराधार रे..
मग मात्र म्हणू नकोस की,
"देवा" माझ्याच बाबतीत असं का रे..??

घेऊ नकोस तू कसलीच माघार..
सुरू होईल तेव्हा सर्वत्र अंधःकार...
एकदा घेऊनी बघ अजून पुढाकार..
तेव्हादेखील असेल तुला माझा आधार..।।

आपल्या मनासारखं नाही घडत..
मग दुसऱ्यांची हिणवणी का..??
घडवं बदल स्वतःमध्ये..
वाद घालण्यापेक्षा हे चांगलं नाही का..??

निर्णय घे अन काहीतरी करून दाखव..
मिळणारं यश तुझंच आहे...
सोडतील साथ सगळी तरी बेहत्तर...
देव तुझ्या पाठीशीच आहे...।।

                       -तेजस्वी शिवाजी मोहिते-