आपल नात

Started by Manojshirke, January 12, 2020, 10:12:32 PM

Previous topic - Next topic

Manojshirke

आपण आपल्या नात्याला प्रेमाचं नाव नको देवूया
एकमेकात ही न गुंतता फक्त सोबत राहूया..
काहीही बोलुदेत हे जग आपल्याला
आपणच आपल्या नात्याला एक नवा अर्थ देवुया..
कदाचित पुढे जावून ठेच लागेल ही आपल्या नात्याला
पण कोणाचाच हात न धरता स्वतः एकमेकांना सावरुया...
आपणच आपल्या नात्याला प्रेमाचं नाव नको देवुया
एकमेकात ही न गुंतता फक्त सोबत राहूया..
तू सांग तुझी सुख दुःख मी ही सांगेन
असे सुख दुःखाचे काही क्षण सोबत जगूया..
नशिबात असेल तर होईल आपलं लग्न
नाहीच झाले तर चांगले मित्र बनून राहूया...
आठवणींचा तो खजिना दोघांसाठी साठवूया
मग त्याच्यावरच आपण आपलं आयुष्य जगूया..
-मन