सरणावरती मोक्ष-वाटा...

Started by jyoti malusare, January 15, 2020, 11:26:32 AM

Previous topic - Next topic

jyoti malusare

ll श्री ll

सरणावरती मोक्ष-वाटा...
---------------------


कर्मावर निर्वाही प्रवास ,,,,असतो जरी आयुष्याचा ,
पूजीत असतो जन्मतःच तरी , पाचवीला आपण पाटा

इमले किती बांधले किनारी , आरासल्या प्राजक्तीं वाटा ,
भुईसपाट होते स्वप्न मग , झडप घालती सागरी लाटा

प्रयास शिणले , थकले होते ,स्मरुनी येतो अंगावर काटा ,
पाटलपुष्प ते पदी तुडवता , रुततो मग अनवाणी काटा

मृगजळासम जीवन आपुले , वाळवंटीं भासे जलसाठा ,
धांवतो कस्तुरीवेगे मनुष्य , धुंडाळितां अंतरी सुवाससाठा

तकलादू हे जीवन सारे , असतो प्रत्यय क्षणाक्षणाचा ,
मरता मरता मागावर असतो , सरणावरती मोक्ष-वाटा


© शब्दज्योत✍️

Atul Kaviraje

Re: सरणावरती मोक्ष-वाटा...ज्योती मालुसरे

     ज्योती मॅडम, अत्यंत अर्थपूर्ण, गहन आशय गाभा असलेली, जीवनाचे वास्तव विदित करणारी, अशी आपली कविता मला खोल विचारात पाडते. कितीही धावपळ करिता हाती काही येत नाही, या पळापळीचा अंत नेहमीच कुठेतरी होत राही.

     मृगजळ, कस्तुरी, स्वप्न, प्राजक्त पुष्पांच्या वाटा, मोठमोठे इमले, मरु-स्थळ, अशा अनेक उदाहरणांनी आपण जीवनाचे व्यर्थ, फोल सार, अतिशय मार्मिकपणे या कवितेतून सांगितले आहे. आपले कौतुक करावे तेव्हढे कमीच.

     जगणे आपुल्या हाती आहे
     जीवन सारे जगून घ्यावे
     मरण कुणी पाहिले पुढती
     आक्रन्दन त्याचे आता का करावे ?

     ही माझी कल्पना, हा माझा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन.

-----श्री अतुल एस परब
-----दिनांक-२६.०५.२०२१-बुधवार.