जर

Started by कवी अमोलभाऊ शिंदे पाटील, January 16, 2020, 06:09:17 PM

Previous topic - Next topic

कवी अमोलभाऊ शिंदे पाटील

*शीर्षक.जर*

विचारू कोणाला प्रेमाचे प्रमाण जळले जर
विचारून बघ तू ही जरासं तुला कळले जर

नशिबाला दोष देऊन जमणार नाही आता
होईल जराशी सुधारणा दारिद्र्य टळले जर

मीचं कोणाशी सांगड घालत नाही सध्या तरी
भीती वाटते मला त्यांनी व्यसनात मळले जर

कविता पूर्ण होणार नाही वाटते मला आता
कवितेने तिला रागाने माझ्यातून वगळले जर

विश्वास बसणार नाही कोणाचा कवितेवर
अर्ध्या कवितेचे पान वहितून निखळले जर

कशाला बांधू घरटे मी आपल्या दोघांसाठी
न मागता उगाच मृत्यूने मला कवळले जर

मुक्त होशील तू दिलेल्या शापातून माझ्या
मयतीत माझ्या कुंकवाची फुले उधळले जर

✍🏻(कविराज.अमोल शिंदे पाटील).
मो.९६३७०४०९००.अहमदनगर