हिवाळा

Started by Rushi.VilasRao, January 17, 2020, 07:31:05 PM

Previous topic - Next topic

Rushi.VilasRao

सायंकाळच्या वातावरणात पसरोय धुंद मधाळ गारवा...
गडबडलेला मनात माझ्या जणु उडू लागला पारवा...
शेकोटीच्या सहवासात जमते गप्पांची मेहाफिल गच्ची वर जेव्हां वाजते जोरात शिटी...
कुडकुडणाऱ्या या थंडीत हवी उबदार पांघरुणाची घट्ट मिठी...
writer:- rushikesh kadam(मी स्वत:च)...
पांढरा शुभ्र धुक्याचा शालू लेवून नटती सारी धरती...
शहरलेल्या या गवतावर पहाटे दवबिंदू जणू गोठती...
ऋतु किती हा सुंदर यात ना लाल लाल तप्त उन्हाळा...
ऋतु किती हा सुंदर यात ना पावसापरी चीप-चीप ओलावा..
ऋतु असा हा सुंदर यात एकत्रित पतंग उडवण्याचा जिव्हाळा....
सर्वांचे तोंड तिळगुळाने गोड करी हा ऋतू याच नाव आहे हिवाळा....
writer:- rushikesh kadam(मी स्वत:च)...
Follow on Instagram for awesome posts @Krushi_bhaijaan