पारदर्शी

Started by शिवाजी सांगळे, January 17, 2020, 10:39:49 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

पारदर्शी

या शब्दांना कुणी सांगावे
मनी भावनांचे गीत व्हावे
आंतरातल्या आर्त वेदनेचे
अस्पष्टसे स्फुलिंग जन्मावे

व्यापार स्वतंत्र भावनांचा
दूज्या मनी कसा रूजावा
चौर्य कर्म करूनी कुणास
का तसा अनुभव स्फुरावा

अनुभुतींचा निचरा होता
शब्दात भाव विचार येतो
पावलोपावली मनाचा तो
मग पारदर्शी आरसा होतो

© शिवाजी सांगळे 🦋
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९