उजाळा

Started by शिवाजी सांगळे, January 19, 2020, 11:59:59 AM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

उजाळा

अनोळखी शहरात नुकता येऊन गेलो
खुणा काही अस्तित्वाच्या शोधून गेलो

चाळवल्या स्मृती अनेक आपसातल्या
उजाळा नव्याने पुन्हा त्यांस देवून गेलो

शोध घे जरासा बागेतल्या पाराजवळी
काठावर फुल गुलाबी एक ठेवून गेलो

रिक्त मी नव्हतो कधी ना आज झालो
गंध माळलेल्या मोगऱ्याचा घेवून गेलो

फुटावी पालवी नित्य स्फूर्ती चैतन्याची
अनोख्या प्रेमाचे रोपटे बघ लावून गेलो

© शिवाजी सांगळे 🦋
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९