लोक काय म्हणतात...

Started by harishnaitam, January 20, 2020, 09:39:44 AM

Previous topic - Next topic

harishnaitam

लोक काय म्हणतात...

कविता करणे हा आहे माझा छंद,
लोक काय म्हणतात म्हणून सोडून द्याच का?
चांगल करा कि वाईट लोक तर बोलणारच,
लोकांच्या म्हण्याप्रमाणे जगलो तर जगणारच नाही ||

कविता करणे कुणाला पण जमत नाही,
मला जमलं ते मि आता सोडणार नाही
सुचतात कविता म्हणून लिहितो,
माझ्या आयुष्यात कुणी नाही ||

जिच्यासाठी मि कविता लिहितो,
ती अजून माझ्या आयुष्यात आलीच नाही
माझ्या मनाला वेड लावून जातात,
पण कुणीच हे वेड मन समजून घेत नाहीत ||

आशेचे किरण दिसतात त्यांना मि आपलं समजतो,
पण ते मला कधीच समजू शकले नाहीत
ते आपले व्हावे म्हणून मी कविता करतो,
पण ते कधीच माझे झाले नाही ||

लोकांना वाटत कि हा प्रेमात पडला,
प्रेमात पडण्याचा प्रयत्न केलो पण पडलो नाही
म्हणूनच सांगतो सर्वाना  कविता माझ्या आभासी आहेत,
कुणासाठी करतेस येवढ्या साऱ्या कविता असे कधी विचारू नका||

कवी : हरिष नैताम
मु-पो. ठाणेगांव या. आरमोरी
जि. गडचिरोली
मो.न. 9834209927