जिवलग

Started by pranali Fulsunde, January 20, 2020, 02:58:43 PM

Previous topic - Next topic

pranali Fulsunde

खरं तर नात्याला नाव नाही काही,
मैत्री म्हणा कि प्रेम म्हणा किंवा अजून काही,
अस हे नातं समजवायला शब्दांची  गरज कधी  भासली नाही,
अन शब्दांनी व्यक्त होईल असा नातं कधी बनलाच  नाही ।

न उलगडणाऱ्या अश्या गोडं नात्यात कधी अडकून गेलो समजलाच नाही,
मैत्री मध्ये प्रेम अन प्रेमा मध्ये मैत्री होऊन एकमेकांचे जिवलग कधी झालो कळलंच नाही ।

ओढ होती एकमेकांची म्हणून होतो सोबती,
ओढ होती एकमेकांची म्हणून होतो सोबती,
सोबत नसलॊ तरी प्रेम असेल एकमेकांसाठी ।

एकत्र असूनपण साथ कधी मिळणारी नव्हती,
आयुष्याच्या प्रवासात पुन्हा भेट होणार नव्हती ।

अनोळखी होऊन भेटण्यापेक्षा आठवणीमध्ये भेटूया एकमेकांच्या ,
अनोळखी होऊन भेटण्यापेक्षा आठवणीमध्ये भेटूया एकमेकांच्या ,
होऊया जिवलग पुन्हा एकदा अन अडकूया नात्यात कधीही न तुटणाऱ्या ।
pranali.vasudha