प्रेम कविता

Started by Swapnildhane, January 20, 2020, 09:16:29 PM

Previous topic - Next topic

Swapnildhane

मागत होतो सहवास तुझा
प्रवास करण्या तुझ्यासवे
हवे होते पर या जटायुला
वेधण्यासाठी क्षितीज नवे

सारुन बाजुला द्वंद मनातले
माझ्या हाती दिलास हात
अशीच राहू दे प्रिये मनी
जन्मोजन्मीची प्रेमळ साथ

लाजणाऱ्या पापण्या तुझ्या
देत होते मजला प्रेमाची साक्ष
तिमिरातल्या या कोंडमाऱ्याला
सापडला होता एक गवाक्ष

टेकवले जेव्हा ओठ भाळी
गंधाळला होता श्वास सारा
अलगद तुझ्या स्पर्शाने हा
उधाणला होता गार वारा

♻स्वप्नचर