होते अनोळखी

Started by कवी अमोलभाऊ शिंदे पाटील, January 23, 2020, 10:52:14 AM

Previous topic - Next topic

कवी अमोलभाऊ शिंदे पाटील

*शीर्षक.होते अनोळखी*

होते अनोळखी काल जे भेटले मला
काळजात राहून त्यांनीच छाटले मला

मी कधीच खेटलो नाही कुसंगतीला
दोन घोट पाजून त्यांनीच बाटले मला

विश्वास बसला इतका त्यांच्यावर माझा
चांगले असतील त्यांचे विचार वाटले मला

कधी दुःखात त्यांचें पाणावले डोळे पाहुन
माझ्या हुंडक्यांन समवेत अश्रूंनी दाटले मला

उंच गगनाला गवसणी घातली होती मी जरा
अन का पतंग समजून त्यांनीच काटले मला

✍🏻(कविराज.अमोल दशरथ शिंदे पाटील).
मो.९६३७०४०९००.अहमदनगर

VIVEK jadhav

खूप छान शब्द जुळवले आहेत