सांजवेळी

Started by अभिजित पुजारी, January 25, 2020, 09:51:51 AM

Previous topic - Next topic

अभिजित पुजारी

आज सांजवेळी मन का हे बावरावे,
थिजलेल्या वाटेवरती सुन्न का बरे असावे...

उत्तर पुढे असूनही प्रश्न न सुटावे,
चालताना वाटेवरती उदासीन उत्तरावे...

केविलवान्या मनात धडपड ही निरर्थक प्रयत्नांचि,
की निरपेक्ष उत्तराना सादहीन साथ प्रश्नांची...

अपेक्ष्यांच्या पाकळया ओंजळीत मात्र जशाच्या तशा,
सांडावयला फुलविति खोट्या आशा...

कुठुनशा निराशेचे फुल मात्र सुकलेले,
शिंपावया त्याला आसवे मात्र दाटलेले...

घेशील का तू समजावून बावरया हया मनाला,
हलुवार चुंबनाची आस ओल्या पापण्याना...

कळ कळतेय रुतलेल्या आतल्या ह्या मनाची,
शब्दाविना आर्त पोहेचेल का स्पश्याची ...

मन हे मनचं असतं...कसे त्याला सावरु,
सांग ना सखे... तूझ्या आसवांना कसे  मी ग आवरु...
अभिजित पुजारी