दुःख

Started by कवी अमोलभाऊ शिंदे पाटील, January 27, 2020, 12:36:15 PM

Previous topic - Next topic

कवी अमोलभाऊ शिंदे पाटील

*शीर्षक.दुःख*

कोणाचे कोणाला जाळते दुःख
बघ तुला माझ्यापासून टाळते दुःख

विसर झाला जगाला तुझ्या माझ्या प्रेमाचा
मी एकटाचं राहिलो विषय निघाला कोणाचा
विषय निघताच तुझा सांभाळते दुःख ...

पुन्हा तू भेट घेशील सांज जवळ येतांना
विरह वेगळा होईल तू मी एक होतांना
तुझ्या प्रेमासाठी विरह ही पाळते दुःख...

असं सहजचं तू i love you बोललीस
बंद माझ्या काळजाची स्पंदने खोललीस
स्पंदना सोबत का अश्रूं ही ढाळते दुःख....

लळा एव्हडा लावलास की शांत न झोप येते
कळतं नाही बघ केव्हा रात्रीची पहाट होते
तुझ्या स्वप्नांशी आठवणींना माळते दुःख.....

रक्ताची शाई होते बोटाचा पेन होतो
तू माझी वात होते अन मी मेण होतो
प्रेमाच्या प्रकाशात का काजळते दुःख.....
बघ तुला माझ्यापासून टाळते दुःख......

✍🏻(कविराज.अमोल दशरथ शिंदे पाटील).
मो.९६३७०४०९००.अहमदनगर