सावली

Started by Shivani Vakil, January 27, 2020, 06:42:57 PM

Previous topic - Next topic

Shivani Vakil

      सावली

भर दुपारच्या ऊन्हात
धरती निघते भाजून
तेव्हा वृक्ष तीच्यातलाच
गारवा शोषून देतात तिला
सावली बनून !

वृक्षांच्या सावलीचा
धरतीलाही असतो आधार
थकलेल्या वाटसरुंचाही होतो
दोन क्षण हलका भार !

दमलेले वाटसरू
हलकेच सुखावतात
मग पुढच्या प्रवासास
ताजेतवाने होतात !

काही माणसेही असतात
अशीच सावलीसारखी
बनतात आधार
निराधार गरजवंतांसाठी !

सावलीसारखच मोठ्ठ व्हावं
माणसाने
स्वतः शांत राहून ऊन सोसावं
आनंदाने !
             - शिवानी वकील