भन्नाट स्वप्न

Started by शिवाजी सांगळे, January 28, 2020, 08:41:11 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

भन्नाट स्वप्न

माझे स्वप्न भन्नाट, वेगळे आहे फार 
आभाळाला घालते चांदण्यांचा हार

दिसली उभी दारावर ढगांची जोडी
लगेचच आणली भली मोठी शिडी

चांदोबा होता कोपऱ्यावरती बसून
हळूच दिलं नंतर त्याला पण टांगून

गेले असता मी ढगात बागडायला
आली ना आई झोपेतून उठवायला

सकाळी खरोखर एक जादू झाली
रात्रच ताऱ्यांची गायब होऊन गेली

© शिवाजी सांगळे 🦋
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९