पण एक प्रश्न

Started by कवी अमोलभाऊ शिंदे पाटील, February 06, 2020, 06:20:56 PM

Previous topic - Next topic

कवी अमोलभाऊ शिंदे पाटील

*शीर्षक.पण एक प्रश्न*

शब्द होता
आता कोणाचं
नाही व्हायचं
उभं आयुष्य एकटं रहायचं
फक्त एकच वाईट वाटलं
तू माझी झाली नाहीस
माझ्या सरणापाशी आली नाहीस
त्या प्रश्नाचं उत्तर सापडलं नाही अजून
तू का बसली होतीस सजून
पण एक प्रश्न सलत राहिला...

प्रेमात का आणि कसा फुल्ल स्टॉप आला
शेवटचा श्वास जीवनातला ग्रेट नॉक झाला

तू समुद्राची किनार पट्टी
मी जसा समुद्र होतो
पण का कोणास ठाऊक
मी संपलेला टॉक टाईम झालो
अन आत्ताचा जिओ प्राईम झालो
तू गेलीस तेव्हा पासून रिचार्ज केलं नव्हतं
मोबाईलच दबड दुकानात नेलं नव्हतं
तुझा फोन येईल म्हणून
माझं स्वप्नं येऊन रडलं होतं
पण एक प्रश्न सलत राहिला...

प्रेमात का आणि कसा फुल्ल स्टॉप आला
शेवटचा श्वास जीवनातला ग्रेट नॉक झाला

किती हिवाळे पावसाळे आले
तुझी माझी मिठी कधी सैल झाली नाही
कधी जोराचं वादळ आलं
प्रेमपत्रा सहित सारं उडवून नेलं
प्रेमात धोका झाला जरी
आठवणींच गाठोडं घेऊन जगलो कसा तरी
पण एक प्रश्न सलत राहिला...

प्रेमात का आणि कसा फुल्ल स्टॉप आला
शेवटचा श्वास जीवनातला ग्रेट नॉक झाला

तू रुसायचीस
आडोशाला बसायचीस
लाडलाड पुन्हा ओठांना स्पर्श करायचीस
मिठीत येऊन गोड गोड बोलायचीस
माझी समजूत काढून पुन्हा
माझ्यात तू एक रूप व्हायचीस
आता तू सारं विसरलीस
आता काय झालं कसं झालं
शेवटपर्यंत कळलंच नाही
अन देहावर तू ठेवलेलं फुलंही जळलंच नाही
पण एक प्रश्न सलत राहिला..

प्रेमात का आणि कसा फुल्ल स्टॉप आला
शेवटचा श्वास जीवनातला ग्रेट नॉक झाला

✍🏻(कविराज.अमोल दशरथ शिंदे).
मो.९७३७०४०९००.अहमदनगर