हाक

Started by अभिजित पुजारी, February 08, 2020, 09:46:48 AM

Previous topic - Next topic

अभिजित पुजारी

"हाक"
आई तुझ्या यातना कळल्याचं नाही कधी,
अंतर्मनाची हाक ऐकलीच नाही कधी,
ओघळणारे असावे... सोबत खोल शून्य नजर उमगलीच नाही कधी ,
वेदनेची लहर चेहऱ्यावरची गवसलीच नाही कधी,
लहान होते गं आई... आतली आई कळलीच नाही कधी,
आणि तू मात्र...
भोगणाऱ्या दुःखाला सुख म्हणत होतीस,
काढत्या पायासवें आलेल्याना कुशल मात्र पुसत होतीस,
सगळं काही गिळत आनंदाचे थेंब शिंपत होतीस,
संस्काराची शिदोरी अजूनही पुरविते गं...आई,
पदराची उब अजूनही आठवते गं... आई,
तुझा धरलेला घट्ट हात बळ होते तेव्हा,
नाही कुणाची साथ कळत होती गं... तेव्हा,
तरीही तू हरवत होतीस...खोल खोल झुरत होतीस,
साथहीन आगीत तू मात्र जळत होतीस,
झळ नको आम्हा म्हणून लाचारीचे कडू पीत होतीस,
दूर गेली तू तरीही तुझी मिठी मात्र घट्ट आहे,
झाड जरी तू असलीस... तरी आम्हा पोरक्या पारंब्याची नाळ मात्र तशीच आहे,
आईविना भिकारी प्रत्येक क्षण अनुभवते आहे,
सुखाची कूस मिळो तुला हीच इच्छा मागत आहे,
कुठून एक वादळ अचानक आलं आणि... झुंजणार झाड उन्मळून गेलं ,
पाठीवरती हात ठेवून माझ्यातली तू... आजही लढायला तयार आहे,
तुझ्या आसवांची शपथ आई... वादळालाही आज मी शमवणार आहे...!

-: अभिजित पुजारी :-
अभिजित पुजारी