आठवं कधी

Started by कवी अमोलभाऊ शिंदे पाटील, February 08, 2020, 11:10:26 PM

Previous topic - Next topic

कवी अमोलभाऊ शिंदे पाटील

आठव कधी तुला मी प्रपोज केला होता
तेव्हा तुझ्या गुलाबाचा भाव वर गेला होता

उत्तर सांगितलं नाहीस तू अजूनही मला
म्हणुन प्रेमाचा घोट विषारी मी पेला होता

काय सांगू तुला आता मी रोजचे रडगाणे
तुझ्या आठवणींचा रोज रातीला मेळा होता

किती अन कुठे खर्च झाले शब्द कळले नाही
तू आल्यावर कळलं तो खजिना तू नेला होता

विसरू नकोस प्रपोज केलेली तारीख वेळ तू
माहीत आहे केलेला प्रपोज अलबेला होता

पुन्हा स्वप्न बनून तू आलीस जीवनात माझ्या
तुझ्यासाठी झुरणारा श्वास आज मेला होता

आज मी तुझ्या प्रेमासाठी तिळतीळ जळतो
मी गेल्यावर कळलं तुझ्या मनात हेला होता