मी बोलणार नाही

Started by dibha, February 16, 2020, 01:24:00 PM

Previous topic - Next topic

dibha

मी बोलणार नाही !!
             तुजा हट्ट आहे
         मी बोलणार नाही.     
           माजा हट्ट आहे
   म्हणून तू बोलणार नाही!   

   तू नाही आणि मी पण नाही
मग मनातल कधी कळणार नाही.
त्यासाठी मी बोलणार नाही!

. या अबोलतुनच गोष्ट समजून गेली
की तुला आणि मला
आपण का बोलणार नाही!

अव्यक्त भावनांना
पाजर फ़ुटणार नाही
पण मी बोलणार नाही!

बोलून व्यक्त ज़ालेल्या भावना
हवेत विरुन जातील
म्हणून बोलणार नाही!

म्हणून कानात सांग
तू का बोलणार नाही!
मग मी पण कधीही
तक्रार करणार नाही
की तू बोलणार नाही!! 
                               
डॉ. दि. भ. हंचाटे
विद्याप्रतिष्ठानचे कमलनयन बजाजचे
अभियांत्रिकी व तांत्रिक महाविद्यालय,
बारामती.