सखे तू अशी रोज भेटत जा

Started by Rupesh Naik, March 01, 2020, 09:33:51 PM

Previous topic - Next topic

Rupesh Naik

सखे तू अशी रोज भेटत जा
तुझी आणि माझी प्रीत अशीच खुलवत राहा ..॥धृ ॥

रातराणीस गंध पण नाही निर्बंध
तू सदाफुली हो अन रोज फुलत राहा
सखे तू अशी रोज भेटत जा
तुझी आणि माझी प्रीत अशीच खुलवत राहा...

तू माझा चंद्र नाहीस समईतील ज्योत तू
अमावास्येसही तेवत राहा
सखे तू अशी रोज भेटत जा
तुझी आणि माझी प्रीत अशीच खुलवत राहा...

तू पावसाची सर नाहीस .. अखंड सरिता तू
सर्व हंगामी तोषवत राहा
सखे तू अशी रोज भेटत जा
तुझी आणि माझी प्रीत अशीच खुलवत राहा...