धर्म इथे बेताल झाला

Started by siddheshwar vilas patankar, March 02, 2020, 05:37:22 PM

Previous topic - Next topic

siddheshwar vilas patankar

धर्म इथे बेताल झाला

उठतासुटता जहाल झाला

वापरले कैक रंग त्याने

कोथळा बाहेर येताना मात्र लालच झाला ...

किती चढले सुळावर त्याच्यानावे ,

मारणारे गनीम आणि मरणारेही ..........

पाळणारे , जाळणारे , बघणारे अन भडकवणारे

पण .........जो तो हलाल झाला

जन्नत नसीब झाली कुणा

तर कुणी स्वर्गात पोहोचले

अरे पण त्यांचे काय झाले असेल ?

ज्यांच्या जाण्याने , उभे घर पोळले

अपराध कुणाचा , कुणी भोगला

कामकऱ्याला जागेवरी ठोकला

मर्दुमकीचा झेंडा मिरवुनी

हिरवा भगवा पुढे नाचला

हिजडे हरामी धर्मवेडे

रंगबिरंगी धर्मांमध्ये

फुका पाजती विषाचा प्याला

माणूस मेला ,,, धर्म राहिला , धर्म राहिला
सिद्धेश्वर विलास पाटणकर C

UNMESH TAYADE

पाटणकर सर जी... उत्तम कविता... वास्तव मांडलं आहे यात... खूप छान...

आपली क्षमा मागून आपली कविता पुढे continue करतोय...आवडली तर दाद द्या.

खरंच आज बेहाल झाला
धर्म इथे जहाल झाला,
मरणा - मारण्याच्या स्पर्धेमध्ये
मानव का बेताल झाला...

कैक रंगांचे प्रहार घेऊन
धर्मवेडा बेमिसाल झाला,
माणुसकीच्या चीलखताचाही
कोथळा लालेलाल झाला...

अपराध कुणाचा, कुणी भोगला
हाच नया सवाल झाला,
खरंच...धर्म इथे जहाल झाला
अन् जो तो यात हलाल झाला...

- उन्मेष तायडे, पुणे
7507455564