!! विचार !!

Started by शिवाजी सांगळे, March 04, 2020, 12:09:49 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

!! विचार !!

तुझाच विचार ! ह्रदयी वसावा !
जन्म हा सरावा ! ध्यानी तुझ्या !!

चराचरी वास ! अस्तित्व रे तुझे !
काय म्हणू माझे ! इहलोकी !!

सारी मोह माया ! मृगजळ भास !
करोनी उदास ! झुलविते !!

क्षणिक डोलारा ! अवघाची सारा !
संसार पसारा ! सुज्ञा लेखी !!

ऐका हाक देवा ! प्राथना ही एक !
सरो जन्म नेक ! उरलेला !!

© शिवाजी सांगळे 🦋
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९