आजोबांचा नागोबा बिळात रुसुन बसला

Started by siddheshwar vilas patankar, March 04, 2020, 01:59:44 PM

Previous topic - Next topic

siddheshwar vilas patankar

आजोबांचा नागोबा बिळात रुसुन बसला

गर्दी वाढली बसमंदी तरी बाहेर नाही आला

त्यांना वाटलं असेल काहीतरी संन्याश्याचं वारं

चारपाच कपारी भेटल्यावरी नीट व्हईल सारं

पोरीबाया सर्व उतरल्या बस रिकामी झाली

नागोबा अजून बाह्येर न्हाई , नक्कीच गडबड असेल खाली

शोधू लागले रस्त्याने मग ते जडीबुटीची दुकाने

बघू बांबूमंदी फरक पडतो का ? तंबूतल्या झाडपाल्याने

जडीबुटीवाला बसला होता दाखवत त्याचे गाजर

टिचकी मारताक्षणी टाकला डायरेक्ट लास्ट गियर 

आजोबा मनोमन भारावले 

बघुनी जडीबुटीवाल्याचे ते ट्रेलर

मला बी बाबा असंच बनवायचंय

माझ्या नागोबाला लेडीकिलर

भरून बाटली दिली त्याने मग

सांगितली सकाळदुपार घ्यायला

तीन थेम्ब टाकुनी दुधामध्ये

लगेच हवी गटकायला

सुरु झाले औषधप्राशन

सकाळ आणि दुपारी

संध्याकाळी मारत सुटले

गर्दीच्या बसमधुनी फेरी

नागोबा हळूहळू जागृत होऊन 

काढत सुटला बाहेर फणा

खुंटीवरती जणू विजार अडकली

आत शांत काही राहेना

येताजाता सर्व प्रवाशी

अचंबित बघत होते

या वयातही यांचे इतके

मोठे कसे ओ राहते

साऱ्या कपारी घेऊनि बाया

दूर उभ्या राहती

भीतीयुक्त नजरेने साऱ्या

त्यांच्याकडे पाहती

आजोबा भारी ओशाळुनी

पुन्हा गेले त्या तंबूत

शिव्या घालुनी बुकललला त्याला

सांगितले आणण्या काबूत

त्याने दिली मग एक पुरचुंडी

सांगितली घेण्यास एकदा रात्री 

नागोबा पुन्हा होईल पहिल्यावाणी

याची दिली मग खात्री

आजी भारी खुश होती

हे आजोबाना नव्हते ठाऊक

पुन्हा तरुण होऊनि नटुनी बैसे

भारी वाटे त्यांचे कौतुक

फणा पुन्हा तो ओसरत गेला

गेली रया ती गेली

नागोबाच आधी ठीक होता

आता कोळंबी त्याची झाली 


=====================

सिद्धेश्वर विलास पाटणकर

सिद्धेश्वर विलास पाटणकर C