कविता

Started by गायत्री सोनजे, March 04, 2020, 06:59:27 PM

Previous topic - Next topic

गायत्री सोनजे

तुझ्याशी बोलताना
डोळे भरुन आले होते
अलगद तुझ्या हाताने
थेंब सारे पुसले होते....

डोळयात बघून माझ्याशी
तेव्हा बोलला होतास
वेडाबाई, सुंदर डोळयात
दु:खाची कशाला हवी आस

मी तुझ्यासोबत असताना
उगा का डोळे भरुन यावे
साताजन्माची साथ आपली
हे आपण का विसरून जावे...

गायत्री
९०२८४९४०५१

vishalrpawar

कविता वाचताना डोळे भरुन आले .......
विशाल रा पवार