वचन

Started by गायत्री सोनजे, March 04, 2020, 07:01:33 PM

Previous topic - Next topic

गायत्री सोनजे

जर संपलेच कधी आयुष्यातून मी
माझी आठवण तुझ्या मनात राहू दे
एकमेकांनाशी बोललेल्या प्रेमळ
शब्दांना तुझ्या वचनात बांधून राहू दे....

कैक दिले होते वचन त्यादिवशी तू
त्या वचनांची उजळणी एकदा करुन घे
अजूनही संपलं नाही नातं आपलं,
त्या ओल्या शाईने सीमारेषा आखून दे

गायत्री
९०२८४९४०५१