अबोला

Started by गायत्री सोनजे, March 04, 2020, 07:04:09 PM

Previous topic - Next topic

गायत्री सोनजे

तुझ्या अबोल्याने
रात्र ही गैर झाली
भिजलेली पापणी
माझ्याशी वैर झाली...

एवढी मोठी शिक्षा
नको रे मला देऊ
अबोला धरुन असा
दूर नको ना जाऊ...

चूक सुधारण्याची
एक संधी तरी दे
प्रेमातला अबोला
लवकर मिटून दे...

कासावीस होतो
जीव माझा इकडे
अबोला सख्याचा
सोडवू कसा तिकडे...

गायत्री

vishalrpawar

विशाल रा पवार

Guykicky

मैं इस कहानी से कुछ जानकारी पाना चाहता हूं।