मन

Started by गायत्री सोनजे, March 04, 2020, 07:05:22 PM

Previous topic - Next topic

गायत्री सोनजे

प्रत्येकाच्या मनाची इच्छा पुर्ण झाली असती तर काय झाले असते. सर्व काही सुरळीत चालू असते.नाही रुसवा नाही फुगवा किती सुंदर सुरेख जीवन सर्वाचे असते.पण का असं घडवले नाही देवाने. असा प्रश्न पडला तर उत्तर मिळत नाही. अन् तेच तेच प्रश्न उभे राहता मनात का बरं असं? कितीही प्रयत्न केला स्वतःला सांभाळून घेण्याचा तरी कुठेना कुठे काहीतरी कमतरता भासत असते.
एखादयाच्या आयुष्यात किती दु:ख भरलेले असते आपण विचारही करु शकत नाही. अन् त्या दु:खातून आपल्याला बाहेर काढणारं कोणी प्रेमळ व्यक्ती भेटलं
तर किती बरं होईल ना? सुख काय असतं ते तरी बघायला मिळेल. दु:ख तर खूप भोगले पण सुखाची चव काय असते तेही चाखून बघितली पाहिजे.
शोधावे कुठे असे ज्यांना खरंच दुस-याचे मन वाचता येते. आणि न वाचता समजूनही घेता येते. इथे तर सर्व वासनेचे भुकेले फिरतात. त्याच्यात खरा प्रामाणिक कसा शोधावा बरं? संपूर्ण चांदण्यात एक तेजोमय शितल चंद्र आहे.तसाचा एखादा आपल्यालाही मिळावा असंच मनात वाटत राहते.

गायत्री