हरवलेली ती

Started by Snehasoni, March 04, 2020, 08:04:55 PM

Previous topic - Next topic

Snehasoni

हरवलेली ती

वाऱ्याची झुळूक येताच जस झाडांची पानं हलतात तशी ती आज हलली आहे
पुन्हा ती तिच्या भूतकाळात जाऊन हरवलेली ती स्वतःला आज शोधत आहे
एकेकाळी बेभान,बावळट असणारी ती आज कुठे तरी शांत बसली आहे
महत्वाकांक्षी असणारी ती आज स्वतःलाच स्वतः मध्ये कुठेतरी शोधत आहे

इकडे तिकडे सतत उनाडक्या मारणारी बिंदास्त निश्चिंत जगणारी ती
जबाबदारीची शाल पांघरून एका वेगळ्याच विश्वात ती आज हरवली आहे
स्वतचं एक वेगळ अस्तित्व निर्माण करून हिमतीनं पुढे जाणारी ती
कधी काळी शांत नसणारी सतत बडबड करणारी आज मात्र शांत बसली आहे

आकाशातील चांदण्याप्रमाणे नेहमी लुकलुकणारी चमकणारी ती
मनाच्या एका कोपऱ्यात हरवलेली ती स्वतःमध्येच स्वतःला शोधत आहे
शब्दांची जुळवाजुळव करून शब्दांशीच कवितेत खेळणारी ती
आज शांत झालेली ती शून्यातून विश्व निर्माण करून उभ राहण्याचा प्रयत्न करत आहे

स्नेहा सोनी
गुजरात

Atul Kaviraje

Re: हरवलेली ती

     स्नेहा सोनी मॅडम, अस्तित्त्व जरी असले, तरीही मनुष्य अनेकदा कुठेतरी हरवल्यासारखा जगत असतो. त्याचे ते जगणं तेव्हा जगणं नसत, जिवंतपणाचा त्यात लवलेशही नसतो, एक प्रकारची कृत्रिमता दिसून येते.

     आणि एक वेळ अशी येते, कि हरवलेला तो केव्हातरी स्वताचाच शोध  घेताना दिसतो. त्याच अस्तित्त्व असतं तिथेच, परंतु त्याला त्याचे भानही नसते. आपल्या कवितेतील नायिका, सुद्धा काही वेगळे जीवन जगत नाहीय. परंतु इतकंच, स्वताचे अस्तीत्व हरपूनही ती स्वतःचा शोध घेऊन काहीतरी नवीन करण्यास पुढे येऊन, गत आयुष्य विसरून, नवं - विश्वाचा मागोवा घेते.

     मनुष्य स्वभाव कुणा कळलाय ?
     मानवी मन कुणा उमजलंय ?
     अंत नाही, आहे ते अपार
     अनंत ते, नाही त्याला थार !

-----श्री अतुल एस परब
-----दिनांक-रविवार - २३.०५.२०२१