तुझं माझं प्रेम मिरवता मिरवता

Started by कवी अमोलभाऊ शिंदे पाटील, March 05, 2020, 11:32:12 AM

Previous topic - Next topic

कवी अमोलभाऊ शिंदे पाटील

*शीर्षक.तुझं माझं प्रेम मिरवता मिरवता*

आता पश्चाताप होतो
तुझ्यावर प्रेम केल्याचा
माझ्या अंधळ्या प्रेमात
माझ्यावर तू गेम केल्याचा

काळजावर झालेल्या घावांची
अन तू खेळलेल्या खोट्या डावाची
अजून उत्तरे दिली नाहीत
प्रश्न विचारणाऱ्या साऱ्या गावाची

कुणाकडे पाहू शकत नाही
चांगला वागू शकत नाही
पैसा अडका संपला सारा
कोणाकडे मागू शकत नाही

मान वर करून छाती ताणून
चालणारा मी गप्प झालो
चारचाकी,राज महालाची स्वप्ने
पाहणारा मी रस्त्यावर आलो

तुझे नखरे पुरवता पुरवता
संसाराची स्वप्ने गिरवता गिरवता
आई बापाची स्वप्ने धुळीस गेली
तुझं माझं प्रेम मिरवता मिरवता

✍🏻(कविराज. अमोल शिंदे पाटील).
मो.९६३७०४०९००.अहमदनगर