कस सांगू मी तुला तू मला का आवडतेस ?

Started by श्री रायमल, March 05, 2020, 02:10:21 PM

Previous topic - Next topic

श्री रायमल

कस सांगू मी तुला

तू मला का आवडतेस ?

नाजुक पाकळया किती सुंदर आणि मन मोहू असतात.

हसर्‍या चेहर्‍या सारख्या रंगीत काळ्या रोजचं उमलत असतात,

नजरेत भिरणार्‍या भरपूर असतात पण

माझ्या ह्रदयाला आवडणारी तू एकटीच आहेस.....



प्रेम काय असत हे तुला पाहिल्यावर मला समजलं

आणि तुला कस सांगू माझ मन तुझ्यात किती खोलवर रूतलं.

तुझ छोटसं नाजुक हसू सुद्धा माझ्या अति रागालाही हसर करून टाकत.

मी कितीही नाही नाही म्हणत असलो तरी ह्रदय तुलाच सगळीकडे शोधत असत.

                                                                                                आता तूच सांग मला तू का आवडतेस ?



खर तर तुझ्या माझ्या पहिल्या भेटीपासुन नवीन आयुष्यं जगू लागलो,

प्रत्येक गोष्टीत प्रेम शोधू पाहू लागलो,तुला पाहण्यासाठी वेळेचं भान विसरू लागलो,

खर तर माझ्या जगण्याची कोमल गरज आहेस तू...माझ्या विचरपेक्षाही सुंदर आहेस तू.

                                      या मुळेच तर मला तू खुप आवडतेस. !!!!




माझ्या प्रत्येक गोष्टीत तू असावं अस हवस वाटू लागलं ,

तू नसलीस तरीही तुझा चेहरा ,तुझ हसू , तुझे केस हे आठवण्याची माझाच काही वेगळी असती,

आज तू कशी दिसतिये हे सांगण्याची माझी धडपड काही वेगळीच असते.

तुझ्या सोबतचे सगळे क्षण जसेच्या तसे जपून ठेवले आहे मी माझ्या ह्रदयात.

                                                                एवढं सर्व असूनही तू विचारतेस ? आता कसं सांगू मी तुला

                                                                तू मला का आवडतेस ?



ज्या दिवशी तुला माझ प्रेम कळेल ना तेव्हा तू व्यक्त करण सोडून मला घट्ट मिठी मारशील

आणि माफ कर ना अस म्हणसील......मी उगचच तुला दूर ठेवत होते अस म्हणशील ....

अरे जीव आहेस तू माझा गरज पडली तर प्राणही देईल,

हात पुढे करून तर बग सात जन्म पुरेल ईतक प्रेम ही देवून जाईल .

आणि तू नक्की हो म्हणशील खात्री आहे मला..

म्हणून तर तू मला माझ्या पेक्षा जास्त आवडतेस ?