मी लिहितो ते तुझ्यासाठी

Started by श्री रायमल, March 05, 2020, 02:37:36 PM

Previous topic - Next topic

श्री रायमल

मी लिहितो ते तुझ्यासाठी
तू दिलेले क्षण अमर करण्यासाठी ...
कधी जेव्हा तू हे वाचसील या कविता
तेव्हा जगू लागशील जुन्या आठवणीसाठी.............

खरच अगदी सारे तसेच्या तसे
जसे आयूष आपण दोघांनी अनुभवले.....
तू हसताना ,माझ्यासी बोलतांना ,माझ्यावर रूसतांना
सर्व काही जसेच्या तसे तुझ्या सोबत प्रेमाने जगलेले.......

फोन वर तू बोलत असताना तुझा आवाज ऐकण्यात
मला खूप बर वाटायचं ,
तुला मनसोक्त हसताना पाहून मन भरून यायचं.
अगदी दोन क्षण ही कोणाला तुझे देवू नये ,
तुझा प्रत्येक स्वास फक्त माझाच आहे असं ही व्हायचं ...............

तुझ असण, हसण, रागवण, मला आदेश देण,
हे ही खूप प्रेमानं लिहिलं आहे..
तू माझ्यावर केलेल्या अतूट प्रेम मी
माझ्या कवितेत संपूर्ण जीवन पुरेल इतपत साठवल आहे..................

तू दिलेले अनमोल क्षण मी माझ्या ह्रदयात
खूप खोल रुतून ठेवलं आहे .
म्हणून फक्त तुलाच लिहीत असतो माझ्या मोडक्या तोडक्या शैलीत..
तुझ सौंदर्य आणि सुंदर मन हे लिहीत असतो तुझ माझ नात अमर करण्यासाठी.....

----दत्तराज रायमल.