आत्महत्या..........!

Started by श्री रायमल, March 05, 2020, 02:57:22 PM

Previous topic - Next topic

श्री रायमल

उजाड झाल शेत ,
आन माझ्या मायच कपाळ ही सून झाल. ...!
पोटाचे पोर पोरके केले,
कर्जापाई बापपणे तर जीवनच संपवले........!

माय भिंतीला डोक लावून
दिवस कसाबसा सरत होती ,,,
लेकर भूक भूक करून उपाशीच मांडीवर
झोपत होती...

राब राब रबुण आयुष्य पूर्ण झिजून गेल,
दुष्काच्या पदरात उभ पीक करपून गेल,
देवा सारखी वाट पहिली देवा तुझ्या पावसाची,
पण पाणी पाणी करताकरता तोंडच पाणी सुद्धा उरल नाही..
पावसाच तर सोडा साध एक वेळच जेवण पण नाही मिळालं पोटाला....

कर्ज माफी करू असे   माजोर नेते येवून मत घेवून गेले,
पण जगाच्या पोशिंद्याला शेवटी भिकेलाच लावले,
कष्ट करणारा बाप डोळ्यासमोर दिसायचं ...!
आणि मालाला भाव नाही हे एकूण चीर काळजात सहन करायचा...

मोठ्या धाडसाने त्याने हा निर्णय घेतला असावा,
सरकार जीवंत नाही तर मेलेल्या पैसे देत हे त्याला माहीत असावं ,
मी जीवंत असून लेकर उपाशी आहे त्याला बगवत नसावं ...
म्हणून त्याला शेवटी लाचारीच जीवन संपवल ....................


दत्तराज रायमल .....