चिरंजीव मराठी

Started by suryakant.dolase, February 26, 2010, 09:48:41 PM

Previous topic - Next topic

suryakant.dolase

***** आजची वात्रटिका *****
**********************

चिरंजीव मराठी

मराठी वाचवा,मराठी वाचवा
ह्या केवळ गप्पा आहेत.
घरोघरी मम्मी,आन्टी,
अंकल आणि पप्पा आहेत.

कुणी इंग्रजाळलेले तर
कुणी हिंदाळलेले आहेत.
मराठीचे सारे संस्कार
माळ्यावरती गुंडाळलेले आहेत.

अशांनी मराठी वाचवा म्हणायचे
काहीसुद्धा कारण नाही !
ज्ञाना,नामा,तुका,एका
जिचे पुत्र,
तिला कधीसुद्धा मरण नाही !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

santoshi.world

अगदी खरे आहे ........... हिच तरी मराठीची खरी शोकांतिका आहे ...  :(

gaurig


अगदी खरे आहे ........... हिच तरी मराठीची खरी शोकांतिका आहे ...  :(

Very true...

Swan

मराठी ला मरण नाही..कधीसुद्धा  ...कितीही प्रयत्न करा. अगदी खरय

मिलिंद कुंभारे

कुणी इंग्रजाळलेले तर
कुणी हिंदाळलेले आहेत.
मराठीचे सारे संस्कार
माळ्यावरती गुंडाळलेले आहेत

अगदी खरे आहे


सुषमा

मराठी असे आमुची मायबोली              मिंग्लिश आमुची नवी मायबोली 


मराठी असे आमुची मायबोली            मराठी जरी आमुची मायबोली
जरी आज ही राजभाषा नसे              अम्हा ही भाषा न बोलता येत असे
नसो आज ऐश्वर्य या माउलीला        नसे आज ऐश्वर्य या माउलीला    
यशाची पुढे दिव्य आशा असे               अन्‌ आशा यशाची मोजकीच असे

जरी पंचखंडातही मान्यता घे           घेतसे पंचखंडातही मान्यता जी
स्वसत्ताबळे श्रीमती इंग्रजी          कशाहीमुळे श्रीमती इंग्रजी    
मराठी भिकारीण झाली तरीही           न बोलता ये वा न लिहिता
कुशीचा तिच्या, तीस केवी त्यजी         भाषाही ती अम्हा फारशी

जरी मान्यता आज हिंदीस देई           "राष्ट्रभाषा" अशी मान्यता हिंदीस आज
उदेले नवे राष्ट्र हे हिंदवी          जरी होती झाली तत्संबंधी वादावादी
मनाचे मराठे मराठीस ध्याती            असो, जन "मराठी" मिंग्लिश भाषेस ध्याती
हिची जाणुनी योग्यता, थोरवी       चाणाक्ष जाणतीलच "मिंग्लिश" ही उपाधी

असू दूर पेशावरी, उत्तरी वा           असू दूर पेशावरी, नॉर्थमध्ये
असू दक्षिणी दूर तंजावरी                  असू दक्षिणी दूर तंजावरी
मराठी असे आमुची मायबोली            मिंग्लिश न्यू आमुची मायबोली
अहो ज्ञानदेवीच देखा खरी                  नव्या काळातली धेडगुजरी

मराठी असे आमुची मायबोली         मिंग्लिश न्यू आमुची मायबोली
जरी भिन्नधर्मानुयायी असू           जरी भिन्नधर्मानुयायी असू
पुरी बाणली बंधुता अंतरंगी            पुरी भिनली ती असे अंतरंगी
हिच्या एक ताटांत आम्ही बसू             तिच्या अंमलात आम्ही असू

हिचे पुत्र आम्ही हिचे पांग फेडू         तिचे पुत्र आम्ही ती "फाडफाड" बोलू
वसे आमुच्या मात्र हृन्मंदिरी               चांगल्या मराठीला लावुनीया सुरी
जगन्मान्यता हीस अर्पू प्रतापे         "जगन्मान्यता" तीस अर्पू सहजी
हिला बैसवू वैभवाच्या शिरी            बसूनी आम्ही कट्ट्याकट्ट्यांवरी    

हिच्या लक्तरांची असे लाज आम्हा          मराठीच्या चिंध्यांची नसे लाज आम्हा 
नका फक्त पाहू हिच्या लक्तरां             पहायचे कशासी तिच्या लक्तरां
प्रभावी हिचे रूप चापल्य देखा          मिंग्लिशचे प्रभावी रूप चापल्य जाणा   
पडावी फिकी ज्यापुढे अप्सरा            पडावी फिकी ज्यापुढे अप्सरा   

न घालूं जरी वाङमयातील उंची           न घालण्या समर्थ आम्ही   
हिरे मोतियांचे हिला दागिने             नकलीही मराठीवरी दागिने
"मराठी असे आमुची मायबोली"             "मिंग्लिश ही आमुची मायबोली"
वृथा ही बढाई सुकार्याविणे               अशी बढाई परी आम्ही करणे

मराठी असे आमुची मायबोली       मराठी मायबोली अमुच्या   
अहो पारतंत्र्यांत ही खंगली                    पुर्‍या गबाळेपणी खंगली
हिची थोर संपत्ति गेली उपेक्षे-           तिची थोर संपत्ति गेली उपेक्षे-   
मुळे खोल कालार्णवाच्या तळी      मुळे खोल कालार्णवाच्या तळी

तरी सिंधु मंथूनि काढूनि रत्ने               वाक्यरचना, व्याकरण, ह्रस्वदीर्घ
नियोजू तयांना हिच्या मंडणी             शुद्धलेखन आणि विरामचिह्ने -
नको रीण, देवोत देतील तेव्हा               गबाळेपणा तत्संबंधित जो आम्ही करतो          
जगांतील भाषा हिला खंडणी                 संपण्याची तो न असती चिह्ने!


   कवी : माधव ज्यूलियन

rudra

कुणी इंग्रजाळलेले तर
कुणी हिंदाळलेले आहेत.
मराठीचे सारे संस्कार
माळ्यावरती गुंडाळलेले आहेत.

oli avadlya...