वाटलं नव्हतं असा येशील..

Started by Falguni Dhumale, March 09, 2020, 12:23:35 AM

Previous topic - Next topic

Falguni Dhumale

वाटलं नव्हतं असा येशील.. न विचारता ह्रदयात शिरशील..
गर्दीत असताना एकटं करशील, एकट्यात असताना गर्दी करशील..
येवढ्यात मला आपलसं करशील.. आणि...
दुसऱ्याच क्षणी निघुन जाशील..
.
.
.
.....'निघून जा' म्हणून ओरडशील.. कारणे शोधुन रागवशील..
जायला लागले तर थांबवशील.. थांबले तर 'तुला जायचे नाही का?' म्हणुन चिडवशील..
गुपचूप बसले तर बोलकं करशील, बोलले तर 'शांत' बसायला सांगशील..
हसले तर 'किती हसतेस गं?' म्हणशील, रडले तर  उगाच हसवशील..
दुसऱ्याशी बोलले तर रागवशील.. तुझ्याशी बोलायला लागले तर 'मला हे का सांगतेस?' म्हणुन ओरडशील..
मी व्यस्थ असताना माझे लक्ष वेधन्याचा प्रयत्न करशील.. तु व्यस्थ असताना मला एकदाही नाही विचारशील..
जवळ असले तर 'दूर जा' म्हणशील, दूर गेले तर रुसुन बसशील..
तु तुझ्या आयुष्यात खुप खुश आहेस, असे वारंवार सांगशील.. माझी तुला गरज नाही ही आठवण मला करुन देशील..
मला माझ्या अस्तित्वाची कायम जाणिव करुन देशील..

वाटलं नव्हतं असा येशील.. कायमचं मला  एकटं करुन जाशील ..
माझ्यासाठी एक करशील?

माझ्यावर येवढा हक्क का दाखवतोस ? फक्त येवढं सांगशील


- फाल्गुनी