'तुला गमवणे' परवडणारे नव्हते..

Started by Falguni Dhumale, March 09, 2020, 12:28:17 AM

Previous topic - Next topic

Falguni Dhumale

वाटते कधी, एकदा तरी भेटावे..
हात धरुन तुझा, परत त्या वाटेवर चालावे..
संपले जरी सर्व काही, मन एकवटून बोलावे..
नि:शब्द झालेल्या वातावरणाला, ओरडून विचारावे..
झुकलेल्या नजरांना, बोलकं करुन, दाद मागत फिरावे..

असा कसा रे निघून गेलास?, कधीच नाही वाटले, माझ्याशी बोलावे..?
जवळ येवून एकदा तरी, कशी आहेस? विचारावे..
तुझ्याशिवाय कशी असेल, हे मनापासुन जाणावे..

खोटेच ठिक, पण बोलले असते..
मनातील सर्व लपवुन, ओठावर हसू आणले असते..
'छान आहे, आधीसारखीच' असे हळवे होऊन बोलले असते..
'काळजी करण्याचे कारण नाही' आता त्या वाटेवर मी जात नसते..
'तुझ्या जाण्याने, मी थांबले..'  असे बोलुन, परत मी तुला दु:खवले नसते..
'जगतांना त्रास होतोय', हे कधीच मी तुला कळू दिले नसते..
'अबोला धरुन काय मिळाले?' हे तर मी विचारुही शकले नसते..
'तु जायला नको होते..' असे परत कधीच म्हटले नसते...

कारण, यावेळी, तुला गमवणे, 'खरचं मला परवडले नसते..'

- फाल्गुनी

Aduuu