तुझी आठवण..

Started by Falguni Dhumale, March 09, 2020, 12:35:54 AM

Previous topic - Next topic

Falguni Dhumale

कळत नाही काय करावे, का तु नसतानाच डोळे भरावे?
या आसवांना का कळू नये, आता तरी वाहने थांबावे..
का यांना फक्त तू नसतानाच यावे वाटते..
मनातील आठवणींना परत जागे करावेसे वाटते..

आता मी पण त्यांच्या सोबत त्यांच्या गतच वागत असते, तु आला आहेस इथे, असा भास मी त्यांना देत असते..
पण माझ्या मनापेक्षा हुशार रे ते, न बोलताच त्यांना सर्व काही कळून चुकते..
आज काल पुर्ण वेळ त्यांच्याच सहवासात जात असतो..
फावल्या वेळेत, तुझ्या आठवणीत आम्ही एकमेकांशी गप्पा मारतो..
कसा असशील? कुठे असशील? का इथे येत नसतो?
हे सगळेच आमचे आवडते विषय यावर पुन्हा-पुन्हा बोलत असतो..

पण माहिती आहे?

तू नसताना, ते मला, कधीच सोडून जात नाहीत...
मी का तुझी आठवण करावी, याची जाणीव कधीच करुन देत नाहीत..
आता हे आसवं खूप जवळचे वाटायला लागले आहेत..
प्रत्येक क्षणात माझ्या डोळ्यात घर करुन राहत आहेत..

एक विचारु?
एकदा तरी येशील का?

आसवांच्या या गर्दीला कायमच थांबवशील का?
नको, नाही म्हणु नकोस.. मला असं राहवत नाही..
तुझ्याशिवाय माझे मन कुठल्याच गावात रमत नाही..
ये, न बोलताच सर्व काही, तुला का? कसे? कळत नाही..


- फाल्गुनी