खोटी शपथ

Started by कवी अमोलभाऊ शिंदे पाटील, March 09, 2020, 07:04:47 AM

Previous topic - Next topic

कवी अमोलभाऊ शिंदे पाटील

*शीर्षक.खोटी शपथ*

ओठांनी ही खोटी
शपथ आज घेतली
तुझ्या माझ्या मिलनाची
अधांतरी मी स्वप्ने वेचली

श्वास अनोळखी झाला
तुझ्यात विलीन होतांना
तुला नी मला पाहिले मी
आज प्रेमात मलिन होतांना

तू ठाव घेत शब्दांचा
आलीस माझ्या उशाला
मी ही किती वेडा वागलो
विचारलं तू आलीस कशाला

बेधुंद राती बेसावध मी
तुझ्या खोडीने जागा झालो
नुसताच कानोसा घेतला कोणी
असाच बहाणा सांगून आलो

ओठांना दोष देणं सोडून
आपुलकी जपावी लागणार
बघ तू जेव्हा होशील माझी
त्या वरचा हक्क तू मागणार

तू धुंद बरसात होतांना
मी ओसाड माळरान होतो
तू सुगरणीने विणलेला खोपा
अन मी विरलेलं पान होतो

✍🏻(कविराज.अमोल दशरथ शिंदे).
मो.९६३७०४०९००.अहमदनगर