आई

Started by अनुप पुरोहित, March 12, 2020, 08:32:02 AM

Previous topic - Next topic

अनुप पुरोहित

           
               आई

एक सावली तिची उब मायेची
प्रत्येकाची काळजी, सोडूनि मात्र स्वतःची

प्रेमाचे हे हात, काही तरी देणारे
मोबदल्यात कधीही अपेक्षा न करणारे

डोळ्यांचे तेज , चंद्राच्या शीतलतेचे
गांभीर्य असे , सागराच्या खोलीचे

दुखणे येता मज, निशीदिनी समीप बसे
ममतेत ईश्वरी शक्ती, मला भय नसे

जिच्या  वास्तव्याने घराला घर पण वाटे
धनप्रतिष्ठा सारे मिळे पण आई पुन्हा न भेटे
                                   
–अनुप पुरोहित