काही तरी हरवलंय

Started by Sachin Mali, March 12, 2020, 12:38:36 PM

Previous topic - Next topic

Sachin Mali

काही तरी हरवलंय

काही तरी हरवलंय पण कळत नाही काय
शोधण्यासाठी निघालो खरा पण वळत नव्हते पाय

माणसाची माणुसकी का माणसाचा इमान
अत्याचार समोर होतांना दिसला तरी आपण बसतो गप गुमान

शेतातून पाणी हरवलंय शाळांमधून शिक्षण हरवलंय
शेतकऱ्याने पण आता निसर्गाकडून अपेक्षा करणे सोडलंय

कुटुंबातील शांतता हरवलीय कि आपल्या लोकांमधील जिव्हाळा
पाऊसही अवेळी पडतो आणि तसाच आहे चटके देणारा उन्हाळा

मुलांचे संस्कार हरवलेत मुलींची हरवलीय लाज
इतके कोणी कसे बदलू शकते असा प्रश्न पडतो आज

प्रेमा मधले प्रेम आणि मित्रांमधली मैत्री हरवली आहे
प्रत्येक गोष्टी मध्ये आता फक्त पैशाने जागा घेतली आहे

मंत्री आणि साहेब यांच्या मधला शिष्टाचार हरवला आहे
म्हणून इतकी वर्ष त्यांनी सामान्य जनतेला वेठीस धरले आहे

एवढ्या सगळ्या गोष्टी शोधून सुद्धा काही तरी हरवलंय
नुसतेच स्वतः पुरता जगून आपण काय मिळवलंय
दुसऱ्यांसाठी जगून पहा देवाने करण्यासारखे खूप काही दिलंय

सचिन माळी
Ph.: 9764987912
Email: - sachin7mali@gmail.com
Date:- 28 Feb 2020