पक्ष्यांचा उन्हाळा

Started by अनुप पुरोहित, March 14, 2020, 08:55:06 AM

Previous topic - Next topic

अनुप पुरोहित

रुक्ष उन्हाळा आला
चौफेर धगधगती ज्वाला
झाडांची केली कत्तल आपण
केले त्यांच्या घरांवर अतिक्रमण

पक्षी पण झाले लाचार
खाण्यास फळे मिळती न  चार
अन्ना साठी जावे दूर
घरट्यात वाटते हुरहूर

पिण्यास पाणी न बसण्यास छाया
आता तरी दाखवा थोडी माया
करा त्यांची छोटीशी  सेवा
पिण्यास पाणी भरून ठेवा
पाणी भरून ठेवा

–– अनुप