काही माणसं

Started by Dshubhangee, March 14, 2020, 09:14:28 AM

Previous topic - Next topic

Dshubhangee

काही माणसं..

काही माणसं मोरपिसारखी असतात
मनाला हळुवार स्पर्श करतात

काही माणसं साखरेसारखी असतात
छोट्या क्षणांतही गोडवा आणतात

काही माणसं सोबत असतात
पाठीशी खंबीरपणे उभी राहतात..

काही माणसं चाफ्यासारखी असतात
अख्खं आयुष्य सुगंधित करतात.

काही माणसं अनोळखी असतानाही
आयुष्यभराची आठवण देऊन जातात..

काही माणसं समजून घेतात
न सांगताही मनातलं ओळखतात..

काही माणसं नाती जपतात
दिलेल्या वचनांना आयुष्यभर जागतात..

काही माणसं चांगली असतात
वाईट गोष्टींना विसरायला लावतात...

काही माणसं...
मलाही यातलंच एक व्हायचंय
चेहऱ्यावर हास्य ठेऊन जगायचंय..

सुखात नसले तरी एकवेळ
पण दुःखात भागीदार व्हायचंय...

दुर असतानाही आठवणीत रहायचंय
मलाही यातलं एक व्हायचंय..

शब्दस्नेह ✍🏻 शुभांगी दिक्षीत.