दुःख असे

Started by कवी अमोलभाऊ शिंदे पाटील, March 18, 2020, 11:34:59 AM

Previous topic - Next topic

कवी अमोलभाऊ शिंदे पाटील

*शीर्षक.दुःख असे*

कधी अन कुणास दाऊ दुःख असे
आता उगाच कुणापुढे गाऊ दुःख असे

तू येशील सांज ढळून गेल्यावर भेटण्या
अनोळखी सुखात कसे न्हाऊ दुःख असे

तू आलीस की सारं बदलून जाणार वाटलं
पण प्रश्न विचारायचे कुठे राहू दुःख असे

बिलगून तू जरा घाव सुकवशील वाटले
विचार करत होते कसे जाऊ दुःख असे

आज आरसा विचारत होता खाणाखुणा
आता कोणत्या आरशात पाहू दुःख असे

घे एकदाचे कवेत आता हे धरणी माते
आधी माणसांनी दिलेले कसे साहू दुःख असे

जमलेले असतात रोज माझ्या थडग्याजवळ
त्यांना पाहून उगाच कशाला वाहू दुःख असे

✍🏻(कविराज. अमोल दशरथ शिंदे पाटील).
मो.९६३७०४०९००.अहमदनगर